dr.satish best web design developer for mac

ऐनापूर ग्रामपंचायत :

गडहिंग्लज तालुक्यामधलं ऐनापूर हे आमचं गाव. अंबोली ,रामतीर्थ पासून अवकळ वाहत येणारी हिरण्येकेशी नदी सारा परिसर हिरवळीन न्हाऊ घालत ऐनापुर गावास वऴसा घालून पुढे जाते. ऐनापूर गडहिंग्लज पासुन 10 कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाजवळूनच हिरण्येकेशी नदी वाहते. सदर नदीला चित्री प्रकल्पाचे पाणी जोडलेले आहे. त्यामुळे नदीला बारमाही पाणी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे गावच्या बागायत शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. गावामध्ये दोन कुपनलिका असुन त्याच्यावर विद्युत पंप बसविलेले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नदीकाठी बांधलेल्या जँँकवेलमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गावची एकूण लोकसंख्या 2236 आहे. गावामध्ये 746 घरे असून ती 556 कुटुंबात वास्तव्य करतात. गावाचे पोस्ट ऑफिस गावामध्येच असल्याने गावातूनच पत्रव्यवहार केले जातात.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 1957 साली झाली आहे. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे.

सरपंच
अॅड. दिग्विजयसिंह किसनराव कुराडे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करतो.

उपसरपंच
श्री. निवृत्ती उर्फ पिंटू नारायण मांगले

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्रीमती सोनल पिराजी हणमंते

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Ainapur Grampanchayat
A/P- Ainapur Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416526

CONTACTS
Phone :02327 – 243164

Office :